सत्यजित राय यांचा जन्म कोलकाता येथे दोन मे 1921 साली झाला. त्यांच्या घराण्यातच कलेचा वारसा होता. त्यांचे आजोबा उपेंद्र किशोर राय प्रसिद्ध लेखक चित्रकार आणि संगीतकार होते. सत्यजित यांचे वडील सुकुमार राय हे कवी , लेखक आणि चित्रकार होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हॉलीवुड चित्रपट, शास्त्रीय संगीत या विषयात रस वाटू लागला. कोलकता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली.
नंतर आईच्या आग्रहाखातर रवींद्रनाथ टागोरांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन या विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. तिथे त्यांचा भारतीय, चिनी व जपानी कलांशी परिचय झाला. नंदलाल बोस बिनोद बिहारी मुखर्जी यांच्यासारख्या निष्णात चित्रकारांचा सहवास लाभला. शांतिनिकेतन येथे पाच वर्षे शिक्षण घेतल्यावर 1942 साली कोलकत्याला आले. तिथे डी.जे. केमर नावाच्या ब्रिटिश जाहिरात कंपनीत नोकरी केली. नंतर त्यांची बदली त्यांचे जेष्ठ सहकारी डी. के. गुप्ता यांच्या सिग्नेट प्रेस या प्रकाशानात झाली. तिथे त्यांनी जवाहरलाल नेहरूंचे डिस्कवरी ऑफ इंडिया व जिम कॉर्बेट यांचे मॅन इटर्स ऑफ कुमाऊ या पुस्तकांची मुखपृष्ठे बनवली. त्याच संदर्भात विभूती भूषण बॅनर्जी यांची पाथेर पांचाली ही कादंबरी त्यांच्या वाचनात आली. त्या कथेचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. इ.स.सन १९४७ मध्ये राय यांनी कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली.
चित्रपटांबद्दल त्यांनी वर्तमानपत्रे मासिके यात लेख लिहिण्यास सुरुवात केली. इ.स. सन 1949 मध्ये प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक ज्यां रेनवार यांच्या द रिव्हर या चित्रपट चित्रीकरणास कोलकत्यात त आले असताना राय यांच्याशी भेट झाली. तिथे त्यांनी पाथेर पांचाली या कथेवर चित्रपट बनविण्याची इच्छा व्यक्त केली. रेनवार यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. मग राय यांनी पाथेर पांचालीसाठी निर्माता शोधणे सुरू केले. ते अशक्य झाल्यावर स्वतःच्या बचतीमधील पैसे वापरून चित्रीकरण सुरू केले. ह्या पहिल्याच प्रयत्नातून बरेच काही शिकता आले असे सत्यजित यांना वाटले. मग पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री डॉक्टर बी.सी. रॉय यांना भेटले. सरकारकडून आर्थिक सहाय्याची हमी मिळाली. प्रसिद्ध संगीतकार पंडित रविशंकर यांनी पाथेर पांचाली या चित्रपटाला संगीत दिले. अनेक अडचणींना तोंड देत हा चित्रपट यशस्वी झाला. याचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्क येथील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट येथे झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली. काही ठिकाणी टीकाही झाली.
पाथेर पांचालीला राष्ट्रपती सुवर्णपदक आणि राष्ट्रीय रजत पदक व अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले. 2005 मध्ये टाईम मासिकाच्या सर्वोत्कृष्ट 100 चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होता. इ.स. सन 1958 ते 1981 या वर्षात त्यांनी एकाहून एक दर्जेदार चित्रपट काढले. यात त्यांनी सर्व विषय हाताळले. 1964 साली रवींद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित चारुलता हा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. 1961 मध्ये तीन कन्या या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःच संगीत दिले. तसेच संवाद पटकथा लेखन हे पण ते करीत असे. पंडित नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी रवींद्रनाथ टागोरांवर माहितीपट काढला. मुंशी प्रेमचंद यांच्या कथेवर हिंदी शतरंज के खिलाडी हा चित्रपट काढला. त्यांचा अगंतुक हा शेवटचा चित्रपट होता. त्याचे बंगालीत लेखन कार्याचे मोलाचे योगदान आहे.
सत्यजित यांना अनेक पुरस्कार सन्मान मिळाले आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाने मानद डॉक्टरेट ही पदवी दिली. 1985 मध्ये 1985 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार. 1987 मध्ये फ्रान्सचा लेसन्स डी ओ न्यू पुरस्कार. सन्माननीय अकादमी पुरस्कार आणि भारतरत्न पुरस्कार. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये दिग्दर्शनातील जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांना मरणोत्तर अकिरा कुरोसावा पुरस्कार मिळाला. जो त्यांच्या वतीने शर्मिला टागोर यांनी स्वीकारला.
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत