Rupali Ganguly : टेलिव्हिजन अभिनेत्री रुपाली गांगुलीने आता राजकारणात प्रवेश केला असून ती भाजपमध्ये सामील झाली आहे. तर पक्षात प्रवेश केल्यानंतर तिने भाजपमध्ये प्रवेश का केला याचे कारण सांगितले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुके केले.
अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका साकारून रुपाली गांगुली घराघरात प्रसिद्ध झाली आहे. तिने बुधवारी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला.
एएनआयशी बोलताना रुपाली गांगुली म्हणाली, “भाजपकडे सगळ्यांना आकर्षित करणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे पंतप्रधान मोदी. त्यांची कार्यशैली, व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी ज्या पद्धतीने देशाला विकासाकडे नेले आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाला ‘मोदी सेने’मध्ये सामील व्हायचे आहे आणि त्यात योगदान देण्याची इच्छा आहे. देश आणि मलाही तेच वाटले आणि म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला”, असे रूपलीने सांगितले.
मार्चच्या सुरुवातीला रूपालीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी मिळाली होती, ज्या भेटीचे तिने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये स्वप्न साकार म्हणून वर्णन केले होते. तिने कंटेंट क्रिएटर्स अवॉर्डला हजेरी लावली आणि ज्युरीमध्ये काम केले. तिथे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.
रुपाली गांगुलीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. दरम्यान, रूपाली 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून मनोरंजन सृष्टीचा एक भाग आहे परंतु स्टार प्लसच्या ‘अनुपमा’ या मालिकेमुळे ती प्रसिद्धीझोतात आली.