गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिकच्या जागेचा तिढा सुटत नव्हता. दरम्यान नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. हेमंत गोडसे या विद्यमान खासदारांनाच पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान आज नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भरती पवार यांनी आपला लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा नाशिकमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.
हेमंत गोडसे आणि डॉ. भारती पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ , दादा भुसे, आमदार संजय शिरसाट हे उपस्थित होते. महायुतीचे हे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नाशिकमधून हेमंत गोडसेंना निवडणून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.