देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण माढा लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
नमस्कार मी तेजस भागवत. ऋतं मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माढ्याचे राजकीय समीकरणे अनेक प्रकारे बदलली गेली आहेत. बारामतीनंतर माढ्यातील निवडणूक ही अत्यंत नाट्यमय घडामोडी धाडून होणार आहे असे दिसून येत आहे. मुख्य लढत ही भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर तर बंड करून शरद पवार गटात गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात होणार आहे. मात्र माढ्यात अनेक दिवसांपासून अनेक नवनवीन समीकरणे जुळत आहेत. सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. शरद पवार गट नी भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी लागोपाठ दोन सभा पंतप्रधान मोदींना या ठिकाणी सोलापूर आणि माढ्यासाठी घ्याव्या लागल्या. रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात कमालीची लढत होणार आहे. आरोप-प्रत्यारोप, शह -प्रतीशह होत असलेल्या या राजकारणात मोहिते पाटलांनी आघाडी घेतली असताना शेवटच्या टप्य्यात मोदींची सभा घेऊन भाजपाने ओबीसी आणि धनगर समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर फडणवीसांनी माळशिरस तालुका भयमुक्त करण्याचे आक्रमक विधान मोहिते पाटलांविरुद्ध करून प्रचाराला धार आणली आहे. तसेच भाजपाने शरद पवारांचे काही सहकारी फोडण्याचे प्रयत्न झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपाकडून इच्छुक होते. मात्र भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच तिकीट दिले. त्यानंतर मोहिते पाटलांनी शरद पवार गटात जाऊन उमेदवारी मिळविली. मोहिते पाटील व भाजपात ताणले गेलेले संबंध बघत शरद पवारांनी देखील मोहिते पाटील घराण्याशी जवळीक साधत त्यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तम जानकर यांच्यासारखे महत्वाचे नेते मोहिते पाटलांनी आपल्याकडे वळवले आहेत.
५ वर्षांपूर्वी माढ्यात भाजपाची ताकद नव्हती. ६ पैकी एकही जागेवर भाजपचा एकही आमदार नव्हता. २०१४ मध्ये मोदी लाटेत देखील राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते. २०१९ मध्ये मोहिते पाटील भाजपात आले आणि त्यांनी भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यानंतर मात्र काही कारणांमुळे मोहिते पाटील हे भाजपापासून दुरावले गेले आणि यंदा तिकीट न मिळाल्यामुळे ती दूरी जास्त वाढली.
धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपाविरोधात शड्डू ठोकले आणि भाताच्या अडचणीत वाढ झाली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील अकलूजच्या सभेत मोहिते पाटील यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. मोहिते पाटील घराण्यातील विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांना भाजपने आपल्या जवळ केले आहे. ही लढाई निंबाळकर- मोहिते पाटील अशी असली तर इतके राजकीय डावपेच खेळत असल्यामुळे फडणवीस आणि पवार यांच्यासाठी देखील ही माढ्याची निवडणूक महत्वाची मानली जात आहे. आता येथील जनता कोणाला साथ देते हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.