दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी बीएआरस नेते आणि तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता या सध्या ईडी कोठडीत आहेत. दरम्यान के. कविता यांनी जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी पार पडली. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेत्या के. कविता यांच्या नियमित जामीन अर्जावरील निर्णय पुढे ढकलला आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा या ६ मे रोजी याबाबत निर्णय देण्याची शक्यता आहे. न्यायालयाने २४ एप्रिल रोजी निर्णय राखून ठेवला होता. तसेच न्यायालयाने ८ एप्रिल रोजी के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता.
सध्या के. कविता न्यायालयीन कोठडीत आहेत. न्यायालयाने ५ एप्रिल रोजी सीबीआयला के. कविता यांची न्यायालयीन कोठडीत चौकशी करण्यास परवानगी देण्यात आली. सीबीआयने ६ एप्रिल रोजी कविता यांची न्यायालयीन कोठडीत चौकशी केली होती. यानंतर ११ एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना अटक केली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिल्ली दारू घोटाळ्याच्या कटात के. कवितांचाही समावेश आहे.