Gurucharan Singh : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून ‘रोशन सिंग सोधी’ या नावाने घराघरात पोहोचलेला टीव्ही अभिनेता गुरुचरण सिंग सध्या बेपत्ता झाल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मागील आठवड्यात गुरूचरण सिंग त्याच्या दिल्लीच्या घरातून बाहेर पडला तेव्हा त्याला विमानतळावर जायचे होते, परंतु तो वाटेतच कुठेतरी गायब झाला होता आणि नंतर तो बेपत्ता झाल. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले ज्यात गुरूचरण सिंग दिल्लीतच दिसला होता. मात्र, आता याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अशा स्थितीत गुरूचरण सिंगने स्वत: बेपत्ता होण्याचा ‘प्लॅन’ केला होता का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
गुरुचरण सिंग दिल्लीतून बेपत्ता होऊन जवळपास 10 दिवस झाले आहेत, म्हणजेच एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. अशा परिस्थितीत तो कुठे गेला आणि तो कसा आहे? असे प्रश्न प्रत्येकाला पडले आहेत. अशा परिस्थितीत आता न्यूज18 ने दिल्लीतील पोलीस सूत्रांकडून काही महत्त्वाची माहिती दिली आहे, जी आश्चर्यकारक आहे.
गुरुचरण सिंह याच्याबद्दल न्यूज18 ने सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या एका विशेष सूत्राने सांगितले आहे की, गुरूचरणने पालम भागात आपला फोन सोडला आहे. आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत पण यामुळे आम्हाला गुरुचरण सिंगचा शोध घेणे अधिक कठीण झाले आहे, कारण आत त्याचा फोन त्याच्याकडे नाहीये.
दिल्ली पोलिसांच्या सूत्राने पुढे सांगितले की, “सीसीटीव्ही फुटेजमध्ये आम्हाला कळले की तो एका ई-रिक्षातून दुसऱ्या रिक्षात जाताना दिसत आहे. त्यानी आधी सर्व नियोजन केले आणि नंतर तो दिल्लीबाहेर गेला असे दिसत आहे. गुरुचरण सिंहला 22 एप्रिल रोजी शेवटचे पाहिले गेले होते आणि आजपर्यंत त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.”