नाशिक लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच ठाकरे गटातील एका नेत्याने बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाने विजय करंजकर यांचा पत्ता कट करून सिन्नरचे असलेले माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या करंजकर यांनी बंडखोरी केली आहे. नाराज करंजकर यांना मातोश्रीवर भेट घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
विजय करंजकर यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी आज नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज भरला आहे. नाशिकमध्ये महायुतीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. समोर तागडे आव्हान असतानाच करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी भरून बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीसमोरील चिंता वाढली आहे.