Bharati Singh Surgery : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे. त्यामुळे भारती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते आणि ती तिचे खास फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. तर आता भारतीच्या चाहत्यांसाठी एक निराशजनक बातमी आहे. कारण भारतीला एका गंभीर आजाराची लागण झाली असून लवकरच तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
याबाबत भारतीने स्वत: माहिती दिली आहे. भारतीच्या पोटात त्रास होत असून तिला काहीही खाता येत नाहीये. गेल्या तीन दिवसांपासून तिला प्रचंड त्रास होत असून तिला गॉल ब्लेडरमध्ये स्टोनची समस्या झाली आहे. त्यामुळे भारतीवर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर भारतीसोबत रूग्णालयात तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील आहे.
सध्या भारतीला कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात भारतीला आपल्या दोन वर्षाच्या बाळापासून दूर राहावे लागत असल्यामुळे ती अधिक त्रस्त झाली आहे. याबाबत भारती व्हिडीओमध्ये म्हणत आहे की, पहिल्यांदाच मी दोन दिवस माझा मुलगा गोलापासून दूर आहे. त्याचा जन्म झाल्यानंतर मी कधीच त्याच्यापासून इतके दिवस दूर राहिली नाहीये. गोलासुद्धा मम्मा, मम्मा करत असल्याचे सांगत भारती भावनिक झालेली दिसली.
दरम्यान, भारतीचा रूग्णालयातील व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. तसंच चाहते तिच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.