देशातील आणि राज्यातील वातावरण सध्या मोठ्या प्रमाणात बदलताना दिसत आहे. राज्यात आणि देशात उन्हाचा पारा इतका वाढला आहे की नागरिकांना दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे अवघड होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये हा इशारा देण्यात आला आहे.
देशातील वातावरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, थंडी तर, काही ठिकाणी पाऊस कोसळत आहे. देशाच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात असलेल्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कुठे पाऊस, कुठे गारपीट, कुठे बर्फवृष्टी तर, कुठे कडक उन्हाळा पाहायला मिळतो आहे. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये देशासह राज्यातील वातावरणात बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, जोरदार गारपीट देखील झाली आहे.