लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर मधील अनुसूचित जाती मातंग समाजातील कन्या पुनम क्षीरसागर हिच्या क्रूरहत्येच्या निषेधार्थ गुरुवार दि.२ मे २०२४ रोजी निषेध मोर्चा व सभा झाली. या सभेत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व आक्रोश व्यक्त केला, पुन्हा आणखी लेकी, बहिणी अशा प्रकारे लव्ह जिहादच्या बळी पडणार नाही असा संकल्प या सभेत करण्यात आला.
या सभेत पिडीत तरुणीची आई, भाऊ व दोन बहिणी उपस्थित होत्या. तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्योती साठे, वर्षा भोसले, प्रीती राऊत, नरेश पवार, योगिता साळवी व नितीन मोरे व उपस्थित होते. तसेच विविध संघटना, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व मानखुर्दमधील सर्व रहिवाशी, विशेषतः महिलांनी या निषेध सभेमध्ये मोठ सहभाग नोंदवला.