देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण रायगड लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
रायगड लोकसभा मतदार संघात महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून माजी खासदार अनंत गीते यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. मात्र रायगडमध्ये मतदारांना चकवा देण्यासाठी एक वेगळीच खेळी खेळली जात आहे. यावेळी रायगडमध्ये तीन गीते दोन तटकरे निवडणूक लढवीत आहेत. नावाशी साधर्म्य असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चिंता वाढवणार का, तसेच याचा यांना फटका बसणार का हे पाहावे लागणार आहे. यंदा देखील मागील निवडणुकीप्रमाणे डमी उमेदवारांचा प्रमुख उमेदवारांना पडण्याची खेळी यातून दिसून येत आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातून यंदा १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. २०१४ साली मोदी लाट असून देखील सुनील तटकरेंनी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना चांगलीच टक्कर दिली होती. अवघ्या २ हजार मतांनी तटकरेंचा पराभव झाला होता. मात्र २०१९ ला चित्र बदलले. मोदी लाट असून देखील तटकरेंनी गीतेंचा पराभव केला होता. मात्र यंदा रायगडमध्ये वेळीच परिस्थिती दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात बदललेलं राजकारण याला कारणीभूत आहे. यामुळे यंदा इथे येणार निकाल धक्कादायक असण्याची शक्यता आहे.
रायगड मतदारसंघ मावळपासून गुहागरपर्यंत पसरलेला आहे. रायगडमंदील अलिबाग, पेण , श्रीवर्धन, महाड आणि रत्नागिरीमधील दापोली, खेड, गुहागर असे तालुके येतात. कष्टकऱ्यांचे नेते म्हणून ओळख असलेले दिबा पाटील देखील इथूनच निवडून आले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी कार्य केले त्या बॅरिस्टर ए. आर अंतुले देखील येहूनच खासदार झाले होते. त्यांनीच यांचे कुलाबा नाव बदलून रायगड असे केले होते.
सध्या रायगडचे प्रमुख राजकारण हे अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्याभोवती फिरत आहे. अनंत गीते हे १९९९ , २००२४, २००९ आणि २०१४ मध्ये येथून खासदार म्हणून निवडून आले. मात्र २०१९ मध्ये तटकरेंनी त्यांना पराभव दाखवला . आता रायगडमधील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार शिवसेनेचे, एक भाजप, एक राष्ट्रवादी आणि एक ठाकरे गटाचा आहे. म्हणजेच येथे देखील महायुतीची ताकद जास्त असल्याचे पाहायला मिळते.
सध्या या मतदारसंघातील भास्कर जाधवचा फक्त ठाकरेंसोबत आहेत. २०१९ मध्ये निवडणूक लढवले शेकापचे अलिबागचे आमदार धैर्यशील पाटील देखील भाजपात सामील झाले आहेत. सहा पैकी ५ आमदार महायुतीकडे असले तरी येथील निवडणूक चुरशीची होईल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. तसेच येथील स्थलांतराचा मुद्दा अजूनही पूर्णपणे सुटलेल नाही. आरोग्याच्या बाबतीत किंवा उच्च शिक्षणाच्या बाबतीत येथील लोकांना मोठ्या शहरात जायला लागत आहे. त्यामुळे यंदा इथे निवडून येणाऱ्या खासदाराने या प्रश्नाकडे लक्ष देऊन ते सोडवणे गरजेचे आहे. त्यामुळे तटकरे कि गीते हे आता ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे. या ठिकाणी ७ मे रोजी मतदान होणार आहे.