शभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
ऋतं मराठीमध्ये एकल्या सर्वांचे स्वागत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीने शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीने डीसी पाटील, आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे कोण किती मते घेतो यावर कोण विजयी ठरणार हे समजणार आहे.
यंदा या जागेवरून मानापमानचे नाट्य चांगलेच रंगले होते. महायुतीत इच्छुकांची संख्या वाढत गेल्याने हा त्रास निर्माण झाला होता. मात्र धैर्यशील माने हे पुन्हा संधी मिळविण्यास यशस्वी ठरले. अनेक अपक्ष आमदार नाराज होते. त्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आले. आता धैर्यशील माने यांच्यासाठी महायुतीचा संयुक्त प्रचार सुरु झाला आहे. तसेच अपक्ष आमदार देखील जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत. धैर्यशील माने यांनी विकासकामांचा आलेख लोकांसमोर मांडायला सुरुवात केली आहे. बऱ्यापकी येथील नाराजी दूर झाल्याचे दिसून येत आहे.
सर्वात आधी राजू शेट्टी मविआकडून उभे राहणार अशी चर्चा होती, त्यांची चर्चा सुरु होती. मात्र केवळ पाठिंबा देण्यास नकार मिळाल्याने शेट्टी आता स्वतंत्र निवडणूक लढवीत आहेत. इचलकरंजी येथील पाण्याचा प्रश्न नि वस्त्रोद्योग यामुळे राजू शेट्टी मागील निवडणूक हरले होते, असे म्हटले जाते. त्यांना गरमाईं भागातील जनता, ऊस उत्पादक, कामगार यांची साथ मिळण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाने सत्यजित सरुडकर यांना उमेदवारी दिली. आश्वासक आणि तरुण चेहरा असल्याने त्यानं मतदारसंघात मिळणार प्रतिसाद देखील अत्यंत चांगला आहे. महाविकास आघाडीच्या वाळवा आणि शिराळा येथील आमदारांची त्यांना चांगली मदत मिळत आहे. तर मुख्य लढत राजू शेट्टी, सत्यजित सरुडकर आणि धैर्यशील माने यांच्यात आहे. मात्र वंचितचे जैन समाजाचे डिसी पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे किती आणि कोणाची मते खातात यावर हातकणंगले या जागेवर कोण गुलाल उधळणार हे स्पष्ट होणार आहे.
या ठिकाण मराठा समाज हा जास्त संख्येने असल्याचे दिसून येते. जैन समाजाची मते डीसी पाटील यांना जातात कि अजून कोणाला त्यावर बाकीचे गणित अवलंबून असेल. थोडक्यात सर्व समाजायचे मतदान यामध्ये महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे प्रचार करताना सर्व समाजाला पूरक असा प्रचार करावा अलंगणार आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील झाली आहे. शेवटच्या टप्प्यात पुन्हा एखादी सभा होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी देखील सभा घेतल्या आहेत. त्यामुळे हातकणंगलेची जनता कोणाला साथ देणार हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.