कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे (एनडीपी) नेते जगमीत सिंग यांनी पुन्हा एकदा भारत-नियुक्त दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे, भारत सरकारचा हात असल्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना जगमित सिंग यांनी भारतावर गंभीर आरोप लादले आहेत.
जगमीत सिंग यांच्या एनडीपीने काही महत्त्वाच्या विधेयकांच्या समर्थनाच्या बदल्यात जस्टिन ट्रुडो यांच्या नेतृत्वाखालील उदारमतवादी अल्पसंख्याक सरकारला पाठिंबा दिला आहे.कॅनडाच्या पोलिसांनी हरदीप निज्जरच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक केल्याची घोषणा केल्यानंतर जगमीत सिंगने यात भारतीय हात असल्याचा आरोप केला आहे.
X वर एका पोस्टमध्ये जगमीत सिंग यांनी लिहिले की, “भारत सरकारने कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाची हत्या करण्यासाठी मारेकरी भाड्याने घेतले होते. आज 3 जणांना अटक करण्यात आली.निज्जरच्या हत्येचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि कॅनडाच्या कायद्याच्या पूर्ण ताकदीने, लोकशाही आणि भाषण स्वातंत्र्याचा मान राखत मी सांगतो की, “हरदीप सिंग निज्जरला न्याय मिळाला पाहिजे”.
गेल्या वर्षी कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनीही या हत्येमध्ये भारतीय हात असल्याचा आरोप केला होता, मात्र हा दावा बिनबुडाचा असल्याचे सांगत भारताने जोरदारपणे नाकारला होता
कॅनेडियन मीडियामध्ये कथित केल्याप्रमाणे कँडियन पोलिस कर्मचाऱ्यांनी भारताशी कोणत्याही संबंधाचा कोणताही पुरावा दिलेला नाही. याआधी शुक्रवारी, कॅनडाच्या पोलिसांनी भारत सरकारच्या कथित संबंधांच्या चौकशीच्या दरम्यान गेल्या वर्षी भारत-नियुक्त दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या तिन्ही व्यक्तींची छायाचित्रे जारी केली आहेत.
रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी (RCMP) एका निवेदनात करणप्रीत सिंग, 28, कमलप्रीत सिंग, 22 आणि करण ब्रार, 22 अशी तिघांची नावे दिली आणि त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली. या तिघांना अल्बर्टा येथील एडमंटन शहरात अटक करण्यात आली . पोलिसांनी तिघांना शुक्रवारी कॅनडातील दोन प्रांतातून अटक केल्याची माहिती समजते. सूत्रांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी या लोकांची ओळख पटवली होती. ते निज्जरच्या हत्या प्रकरणात असल्यानं त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत होती.
रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या तिघांवर आता प्रथम-डिग्री खून आणि हत्येच्या संबंधात हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिन्ही आरोपींच्या छायाचित्रांसह, कॅनडाच्या पोलिसांनी सरे परिसरात आणि आजूबाजूच्या हत्येच्या वेळी संशयितांनी वापरलेली कारची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना, RCMP सहाय्यक आयुक्त डेव्हिड टेबोल,यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले की, “निज्जरच्या हत्येतील कथित सहभागाबद्दल तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत मी असे म्हणेन की हे प्रकरण सक्रियपणे तपासात आहे,”
“या प्रकरणांमध्ये स्वतंत्र आणि वेगळे तपास चालू आहेत, आज अटक करण्यात आलेल्या लोकांच्या सहभागापुरतेच ते मर्यादित नाही आणि या प्रयत्नांमध्ये भारत सरकारशी असलेल्या संबंधांची चौकशी करणे समाविष्ट आहे,” असेही तेबोल म्हणाले.
सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांनी भारत सरकारशी संबंधित काहीही बोलण्याचे नाकारले तसेच “मला कॅनडा सरकारच्या सुरक्षा यंत्रणा आणि RCMP च्या कामावर आणि (कॅनेडियन) सुरक्षा गुप्तचर सेवा करत असलेल्या कामावर पूर्ण विश्वास आहे,” लेब्लँक म्हणाले आहेत. .
2020 मध्ये भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हरदीप सिंग निज्जरला गेल्या वर्षी जूनमध्ये सरे येथील गुरुद्वारातून बाहेर पडताना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या वर्षी मार्चमध्ये समोर आलेल्या त्याच्या हत्येचा व्हिडिओ समोर आल्यानंतर निज्जरला सशस्त्र लोकांनी गोळ्या घातल्याचे दिसले ज्याचे वर्णन “कॉन्ट्रॅक्ट किलिंग” असे करण्यात आले.