लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आले आहेत असे म्हणायला हरकत नाही. कारण आधी सुरत आणि मग मध्य प्रदेशमध्ये काँग्रेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने तिथे भाजपचा विजय निश्चित झाला आहे. मात्र अधिकृत घोषणा किंवा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. मात्र आता काँग्रेसला तिसरा धक्का बसला आहे. तो धक्का ओडिशा राज्यात बसला आहे. काँग्रेस उमेदवार सुचारिती मोहंती या पुरी लोकसभेमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र आता त्यांनी आपले तिकीट मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात.
निवडणूक लढवण्यासाठी पैशांची कमतरता असल्याने सुचारिती मोहंती यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सुचरिता मोहंती पुरीमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर भाजप नेते संबित पात्रा यांच्याविरोधात निवडणूक लढवत होत्या. पण आता त्यांनी माघार घेतली असून सुचरिता मोहंती काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी माघार घेतली आहेत.