गायक आणि अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनास याने अलीकडेच एक व्हिडिओ म्हटले आहे की त्याला इन्फ्लूएंझा ए हा आजार झाल्यामुळे त्याला त्यांचा शो अचानकपणे रद्द करावा लागला आहे. निकने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्पष्टीकरण दिले की त्याच्या आजारपणामुळे तो काही दिवस स्टेजवर काम करू शकणार नाही.या हॉलिवूड गायकाने तब्येतीच्या कारणामुळे स्वतःचे अनेक कॉन्सर्ट रद्द केले आहेत .
या गायकाने त्याच्या चाहत्यांची ‘निराश’ केल्याबद्दल त्यांची माफी मागितली आणि जोनास ब्रदर्सच्या शोच्या तारखा बदलल्या गेल्याचे नमूद केले. केविन जोनास, निक जोनास आणि जो जोनास यांचा समावेश असलेले हे त्रिकूट या आठवड्याच्या शेवटी मेक्सिकोमध्ये परफॉर्म करणार होते.
त्याच्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना, निकने एक लांब कॅप्शन लिहिले की, ” काही दिवसांपूर्वी, मला एक प्रकारचा जडपणा वाटू लागला ; जेव्हा मी उठलो आणि बघितले तेव्हा माझा आवाज गेला .गेल्या दोन, अडीच दिवसांत, मी दिवसभर अंथरुणाला खिळून होतो, ताप, अंगदुखी, घसा खवखवणे आणि खूप वाईट खोकला.मी सध्या अनुभवतो आहे. ”
“यातून बरे होण्यासाठी , सावरण्यासाठी मला थोडा वेळ द्या, . मला माफ करा. मला तुमची निराशा करणे आवडत नाही. तुम्ही आम्हाला पाठिंबा देण्यासाठी खूप काही करता. तुमच्यापैकी बरेच जण त्या शोमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवास करून आले असतील. याची मला कल्पना आहे.
जोनास ब्रदर्स पुढील शो आयर्लंडमध्ये, त्यानंतर सप्टेंबरमध्ये यूके, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्पेन, इटली आणि स्वित्झर्लंडमध्ये परफॉर्म करतील. त्यांचा अंतिम कार्यक्रम 16 ऑक्टोबर रोजी पोलंडमध्ये होणार आहे.