देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
आज आपण देशासह राज्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या आणि जिथे एकाच कुटुंबात लढत होणार आहे अशा बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी बोलणार आहोत. एक ते दीड वर्षांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार आपल्या सहकारी आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडले आणि महायुतीत सामील झाले. त्यानंतर पक्ष चिन्ह आणि इतर झालेल्या गोष्टी आपण जाणतोच.
बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजेच बारामती, असे समीकरण गेली ६ ते ७ दशके सुरूच आहे. मात्र आता हे समीकरण बदलण्याचे प्रयत्न बारामतीत सुरु झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे पुन्हा एकदा खासदार होण्याचा मार्ग खडतर झाला आहे. कारण महायुतीने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे यंदा बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भावजय अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदा मतदान कोणाला करायचे हा गहन प्रश्न बारामतीच्या जनतेपुढे आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस बारामती जिंकणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा भाजपसह महायुती सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार हे स्पष्ट आहे.
दरम्यान अजित दादानी गेल्या काही वर्षात बारामती लोकसभा मतदार संघाचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या बंडामागे ३५ पेक्षा जास्त आमदार आणि लाखो, हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यामागे उभे राहिले. सुनेत्रा पवार यांचा देखील सामाजैक कार्यातून चांगलाच जनसंपर्क असलेल्या पाहायला मिळतोय. त्यात त्यानं भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, शिवसेना आणि महायुतीतील घटक पक्ष यांची ताकद मागे उभी राहिली आहे. असं म्हटले जाते कि भाजपाने आपल्या लोकसभेच्या विजयात AB असा एक फॉर्म्युला तयार केलेला. ए म्हणजे अमेठी आणि बी म्हणजे बारामती. गेल्या काही वर्षात बाजपणे बारामती आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. यंदा बारामती जिंकण्यासाठी त्यांना खुद्द अजित पवारांची मदत मिळणार आहे.
पवार कुटुंबात फूट पडल्याचे जवळजवळ दिसून येत आहे. दोन्हीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत. त्यामुळे यंदाची बारामतीची निवडणूक हायव्होल्टेज होणार आहे. बारामती लोकसभेत ६ विधानसभा मतदारसंघ येतात. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर हवेली, भोर आणि खडकवासला हे ६ मतदारसंघ येतात. यामध्ये भाजपाचे २, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि काँग्रेसचे २ असे आमदार आहेत. एकंदरीत पाहिले तर महायुतीची ताकद मोठी दिसून येत आहे. मात्र सगळे राजकारण हे पवार कुटुंबाभोवती फिरत असल्याने येथे काय होणार हे कोणीच विश्वासाने सांगू शकत नाहीये.
महायुतीचे आमदार असलेल्या भागातून सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मोठ्या प्रमाणत मिळणे अवघड असणार आहे. कारण येथून सुनेत्रा पवारांना मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. तर इंदापूर, बारामती शहरात देखील सुळेंना किती मतदान होते त्यावर त्यांच्या विजयाची गणिते अवलंबून असतील. त्यामुळे यंदा बारामतीची निवडणूक हायव्होल्टेज असणार आहे. देशासह सर्वांचेच लक्ष या लोकसभा मतदार संघाकडे लागून राहिले आहे.