लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात प्रचार सभा घेत आहेत. आज ते झारखंड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी झारखंडमधील पलामू येथील प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी जनतेच्या मताची ताकद काय असते, यावर त्यांनी भाष्य केले. तुमच्या एका मतामुळे आज जगभरात भारतच डंका वाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून काय काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.
पलामू येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”तुमच्या एका मतामुळे राम मंदिर उभे राहिले आर्टिकल ३७० रद्द झाले, नक्षलवाद संपला, दहशतवादावर अंकुश बसला. या मताच्या ताकदीवर भातात ताकदवान होत आहे. जो घरात घुसून मारतो. याआधी काँग्रेस जगभरात जाऊन मदत मागायची. आज पाकिस्तान जगभरात मदत मागत आहे.”
त्यांनी पलामूचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार विष्णू दयाल राम यांच्यासाठी मते मागितली. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि मित्रपक्षांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की काँग्रेस आणि त्यांच्या शक्तिशाली JMM-RJD ला दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण लुटायचे आहे, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत संविधान आणि आरक्षणात एकही छेडछाड होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रचार सभांमधून काँग्रेसवर, इंडिया आघाडीवर, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका करत आहे. भाजपाने यंदा अब की बार ४०० पारचा नारा दिला आहे.