लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
देशभरात प्रचार सभा घेत आहेत. यावेळी ते इंडिया आघाडी, काँग्रेस आणि
काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार प्रहार करत आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या एका
प्रचारसभेत दशतवादावर भाष्य केले आहे. दशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर
भांडण्यासाठी काँग्रेस सरकार पाकिस्तानला प्रेम पत्र पाठवत असे. मात्र
पाकिस्तानच्या त्याच्या बदल्यात अजून दहशतवादी भारतात पाठवत असे, अशी
टीका पंतप्रधान मोदींनी केली आहे.
पंतप्रधान मोदी सभेत बोलताना म्हणाले,
”२०१४
च्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही दिलेल्या एका मतामुळे देशात दहशतवाद संपुष्ठात आला.
मात्र २०२४ मध्ये राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा पाकिस्तानचे नेते
मंडळी करत आहेत.”तुमच्या एका मतामुळे राम मंदिर उभे राहिले आर्टिकल ३७० रद्द झाले,
नक्षलवाद
संपला, दहशतवादावर अंकुश बसला. या मताच्या ताकदीवर भातात ताकदवान होत आहे.
जो घरात घुसून मारतो. याआधी काँग्रेस जगभरात जाऊन मदत मागायची. आज पाकिस्तान
जगभरात मदत मागत आहे.”