जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. या भ्याड हल्ल्यात ५ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. बसच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना हा हल्ला झाल्याने सर्वत्र सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.
हल्ला झाल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. शाहसीतारजवळील जनरल हवाई परिसरात हवाई तालाच्या आतमधील इतर सर्व वाहने आणि वस्तू सुरक्षित करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यात ५ जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले आहेत.