Mumbai Police : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकिकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बीकेसी परिसरात मुंबई पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी तब्बल 5,10,100,500 रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी बीकेसी परिसरातील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी धाड टाकून बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदांचा साठा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अली सय्यद आणि नौशाद शाह या दोघांना अटक केली आहे.
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांकडून दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. सोबत या बनावट नोटा तयार केल्यानंतर त्या कुठे वितरीत केल्या जात होत्या, याप्रकरणात कोणाचा हात आहे, या सर्व गोष्टींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.