Bhavesh Gupta : ‘पेटीएम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष भावेश गुप्ता यांनी कंपनीला तडकाफडकी राजीनामा दिला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.
एका निवदेनामध्ये भावेश गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांमध्ये पेटीएमने पेमेंट्स आणि वित्तीय सेवांमध्ये निर्माण केलेल्या नेतृत्वाची खोली पाहता नवीन उंची गाठण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच वैयक्तिक कारणांमुळे मी माझ्या करिअरमध्ये ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
भावेश गुप्ता यांच्या देखरेखीखाली पेटीएम पेमेंट्स आणि कर्ज देण्याच्या व्यवयास चालायचा. तसेच आता कंपनीचा एक फेरबदलाचा भाग म्हणून गुप्ता सल्लागार म्हणून भूमिका पार पाडतील. तर वर्षाच्या अखेरीस ते पेटीएमच्या वाढीच्या उपक्रमांसाठी मार्गदर्शन करतील.