PM Narendra Modi : लोकसभा निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचारही 5 मे रोजी थांबणार आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार आहेत. येथे पंतप्रधान मोदी मेगा रोड शो करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी अयोध्या सजवण्यात आली आहे. अयोध्येला पोहोचल्यानंतर पीएम मोदी रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी येथे निवडणूक रॅलीला संबोधित करणार आहेत.
अयोध्येला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वप्रथम रोड शो करणार आहेत. विशेष म्हणजे हा रोड शो खास असणार आहे. कारण पीएम मोदी खास रथावर स्वार होऊन रामपथवर रोड शो करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. रोड शोपूर्वी पीएम मोदी आणि सीएम योगी आदित्यनाथ राम मंदिरात जाऊन रामललाची पूजा करतील आणि आशीर्वाद घेणार आहेत.
नंतर पीएम मोदी रात्री 8.40 वाजता अयोध्येहून निघून ओडिशाला पोहोचतील. पीएम मोदी काही तासांसाठीच अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. तर पंतप्रधान मोदी संध्याकाळी 6.40 वाजता अयोध्येतील महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. यानंतर 7 वाजता पीएम मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचतील. दोन्ही नेते राममंदिर संकुलात सुमारे 15 मिनिटे थांबतील. यानंतर संध्याकाळी 7.15 वाजता पंतप्रधान रामजन्मभूमी सुग्रीव किल्ला राम पथ रस्त्यावर रोड शो करतील.