Women’s T20 World Cup 2024 Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) महिला T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. तर यंदाच्या वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान बांगलादेशकडे आहे. तर यावेळी विश्वचषक स्पर्धेत एकूण 10 संघ असतील, ज्यामध्ये अंतिम सामन्यासह एकूण 23 सामने 19 दिवसात खेळवले जातील. सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला प्रत्येक गटात 4-4 सामने खेळावे लागतील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर चार संघांमध्ये प्लेऑफची लढत होईल.
3 ऑक्टोबरपासून महिला T20 विश्वचषक 2024 सुरू होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने ढाका आणि सिल्हेत येथे खेळवले जातील. तर उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 20 ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना खेळवला जाईल. टीम इंडियाच्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि क्वालिफायर 1 आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाचा सामना 6 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.
महिला T20 विश्वचषक स्पर्धेत, सर्व संघ गट टप्प्यात प्रत्येकी चार सामने खेळतील, त्यापैकी प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीचा सामना 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
T20 विश्वचषक 2024 चे गट-
अ गट: ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर १
ब गट: दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर २
T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक
3 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
3 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
4 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध क्वालिफायर 1, सिलहट
4 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
५ ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
५ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, ढाका
६ ऑक्टोबर: न्यूझीलंड विरुद्ध क्वालिफायर १, सिल्हेट
६ ऑक्टोबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
७ ऑक्टोबर: वेस्ट इंडिज विरुद्ध क्वालिफायर २, ढाका
8 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, सिल्हेट
९ ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
९ ऑक्टोबर: भारत विरुद्ध क्वालिफायर १, सिलहट
10 ऑक्टोबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
11 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
11 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर 1, सिल्हेट
12 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका
12 ऑक्टोबर: बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ढाका
13 ऑक्टोबर: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, सिल्हेट
13 ऑक्टोबर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिल्हेट
14 ऑक्टोबर: इंग्लंड विरुद्ध क्वालिफायर 2, ढाका
17 ऑक्टोबर: पहिली उपांत्य फेरी, सिलहट
18 ऑक्टोबर: दुसरी उपांत्य फेरी, ढाका
20 ऑक्टोबर: अंतिम, ढाका