यवतमाळमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे दारव्हा हादरून गेले आहे. एका दुचाकीला भरधाव वेगात असणाऱ्या गाडीने धडक दिल्याने दोन तरुणांचा त्यात मृत्यू झाला आहे. काम आटपून घराकडे परतत असताना तरुणांवर काळाने घाला घातला आहे. ज्या गाडीने या दुचाकीला धडक दिली ती गाडी तेथील तहसीलदारांची असल्याचे समजते आहे. अपघातानंतर गाडीचा चालक फरार झाल्याचे समजते आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, पुढील तपास सुरु केला आहे.
तालुक्यातून आपले काम आटपून दोन युवक आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी दुचाकी आणि चार चाकीचा भीषण अपघात झाला. धडक दिलेली गाडी आर्णी यवतील तहसीलदारांची असल्याचे समजते आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते आहे. कर चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.