लोकसभा निवडणुकीसाठी उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. काल तिसऱ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावला आहे. निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. मुंबईमध्ये भाजपाने ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या प्रचारात २६/११ हल्ल्याचा मुद्दा एकदा उपस्थित केला आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत एक मोठा दावा केला आहे.
२६/११ च्या मुमबीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ATS चे अधिकारी हेमंत करकरे हे शहिद झाले होते. मात्र त्यांच्यावर पाकिस्तानी दहशतवाद्याने नाही तर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी समर्थित अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या. ही गोष्ट वकील उज्वल निकम यांनी लववून ठेवली. देशद्रोही व्यक्तीला लोकसभेचे तिकीट देणारा भाजप पक्ष देशद्रोह्यांना पाठिंबा देणारा आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. या त्यांच्या डावयावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी सडकून टीका केली आहे. बावनकुळे म्हणाले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोंडात पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चालली गोळी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध त्यांनी लावला आहे. भाजपाला विरोध करण्यासाठी हे किती खालच्या पातळीला जाणार आहेत. या प्रकारे बावनकुळे यांनी वडेट्टीवार यांच्यावर सडकून टीका केली.