लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात प्रचार सभा घेत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी ब्रम्हपुर येथे प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी दोन यज्ञ एकाच वेळी होत आहेत. ते म्हणजे केंद्रात सरकार करण्यासाठी आणि दूर म्हणजे राज्यात सरकार बनवण्यासाठी, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच ४ जून हा दिवस बीजेडी सरकारचा शेवट असेल, असे ते म्हणाले.
बेहरामपूर येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”ओडिशामध्ये यंदा डबल इंजिन सरकार बनेल असा विश्वास आहे. तसे मी भगवान जगन्नाथ यांच्या पवित्र भूमीवर उपस्थित आहे याचा मला आनंद आहे. मी येथे तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. आज जर अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान रामलल्ला विराजमान आहेत, तर ते तुमच्या मताच्या शक्तीमुळे! ओडिशामध्ये दोन ‘यज्ञ’ एकत्र होत आहेत, एक म्हणजे भारतात मजबूत सरकार बनवणे आणि दुसरे म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखाली एक मजबूत राज्य सरकार बनवण्याचा तुमचा उत्साह दिसून येतो आहे.”
भाजपच्या एक्स हँडलनुसार, पंतप्रधान मोदी पहिल्यांदा ओडिशामध्ये जाहीर सभांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी ब्रह्मपूर, ओडिशात आणि नबरंगपूरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील. यानंतर ते आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे दुपारी ३.३० वाजता आणि अनकापल्ले येथे सायंकाळी ६.४५ वाजता प्रचार सभा घेणार आहेत.