दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी बीआरएस नेते के. कविता यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाने २४ एप्रिल रोजी कविताच्या नियमित जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. यापूर्वी ८ एप्रिल रोजी कोर्टाने न्या कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता. सुनावणीदरम्यान ईडीने सांगितले होते की, मनी लाँड्रिंग प्रकरणात के. कविता या महिला असल्याने तिला जामीन देताना कोणतीही सवलत देता येणार नाही. सुनावणी दरम्यान. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी कविता यांच्या वतीने हजेरी लावत ईडीवर आरोप केला होता की ईडी ही तपास यंत्रणा नसून त्रास देणारी एजन्सी बनली आहे. सिंघवी म्हणाले होते की, या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पक्षपाती झाला आहे.
के. कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना ११ एप्रिल रोजी सीबीआयने अटक केली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात के. कविताचा यांचाही या कटात सहभाग होता. दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात के. कविता न्यायालयीन कोठडीत होत्या. याप्रकरणी सीबीआयने ६ एप्रिल रोजी के. कविता यांची चौकशी केली. न्यायालयाने ५ एप्रिल रोजी सीबीआयला के. कविता यांची न्यायालयीन कोठडीत चौकशी करण्यास परवानगी देण्यात आली होती.