Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी आज (7 मे) मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्यातील एकूण 93 जागांवर मतदान होत आहे. तर आज सकाळी मतदानाला सुरूवात झाली असून अनेक सामान्य जनतेसह अनेक दिग्गज नेते, सेलिब्रिटी मतदानासाठी केंद्राकडे निघाले आहेत. यामध्ये शरद पवार यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला.
शरद पवार हे सुप्रिया सुळे आणि इतर कुटुंबियांसह मतदान केंद्रावर दाखल झाले. शरद पवारांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमध्ये मतदान केलं.
दरम्यान, आजच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानामध्ये फक्त राज्यातीलच नाही तर देशातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यामध्ये उदयनराजे भोसले, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, धैर्यशील मोहिते-पाटील, नारायण राणे, सुनिल तटकरे, प्रणिती शिंदे, छत्रपती शाहू महाराज, अमित शाह, शिवराज सिंह चौहान अशा अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.