आज सुरू असलेल्या मतदानादरम्यान, केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे धारवाडमधील उमेदवार, प्रल्हाद जोशी यांनी हुबली, धारवाड येथील मतदान केंद्र क्रमांक 111 वर मतदान केले आणि पक्ष विजयी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
पक्ष किती जागा जिंकेल, असे विचारले असता, जोशी म्हणाले, “आम्ही (राज्यातील) 14 पैकी 14 जागा जिंकू.”
धारवाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने प्रल्हाद जोशी यांच्या विरोधात विनोद आसूती यांना रिंगणात उतरवले असून ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
1980 ते 1996 पर्यंत, धारवाड ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला होती, परंतु 1996 मध्ये भाजपच्या विजय संकेश्वर यांनी ही जागा जिंकली आणि काँग्रेसची विजयाची मालिका खंडित केली. त्यानंतर ही जागा भाजपने राखली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रल्हाद जोशी यांना 6,84,837 मते (56.4 टक्के) मिळाली होती. , तर काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी 4,79,765 मते (39.5 टक्के) दुसऱ्या स्थानावर होते. बसपाला इरप्पा भरमप्पा मदार ६,३४४ मते (०.५ टक्के) मते पडली होती. .
सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 93 लोकसभा जागांवर मतदान होत आहे.