लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळनंतर मतदानात लक्षणीय वाढ झाली असून, 11 वाजेपर्यंत बंगाल 32.82 टक्क्यांसह आघाडीवर आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
गोव्यातही ३०.९४ टक्के जास्त मतदान झाले आहे. मात्र सकाळी 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदानात महाराष्ट्र अजूनही मागे आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी सकाळी ११ वाजेपर्यंतची अशी आहे- आसाम–27.34 टक्के, बिहार-24.41 टक्के, छत्तीसगड–29.90 टक्के, गुजरात–24.35 टक्के, कर्नाटक–24.48 टक्के, मध्य प्रदेश–30.21 टक्के आणि उत्तर प्रदेश–26.12 टक्के.
तर केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 24.69 टक्के मतदान झाले.
सत्ताधारी भाजप आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.