आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी राज्यात मतदान होत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. त्यामुळे पहिल्या 2 टप्प्यांच्या तुलनेत या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले असल्याचे दिसून आले.
मात्र सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात बारामतीमध्ये सर्वात कमी म्हणजे १४ टक्के तर कोल्हापुरात २३ टक्के मतदान झाल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रात झालेले मतदान खालीलप्रमाणे
सातारा – 18.94 टक्के
सोलापूर –15.69 टक्के
लातूर – 20.74 टक्के
सांगली – 16.61 टक्के
बारामती – 14.64 टक्के
हातकणंगले – 20.74 टक्के
कोल्हापूर – 23.77 टक्के
माढा – 15.77 टक्के
धाराशिव – 17.06 टक्के
रायगड –17.18 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 21.19 टक्के