आज एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा चालू असताना बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आज मुस्लिम आरक्षणाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.की मुस्लिमाना आरक्षण मिळालेच पाहिजे.
कर्नाटक आणि आंध्रमधील एससी, एसटी आणि ओबीसींचा कोटा कमी करून काँग्रेसने मुस्लिमांना आरक्षण दिल्याचा आरोप जकारात गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी बिहारच्या उजियारपूर येथे एका सभेला संबोधित केले होते. आता यावर लालू प्रसाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘अबकी बार, 400 पार’ या घोषणेवरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आणि ते म्हणाले, बिहारमध्ये लालू-राबडी यांच्या कार्यकाळात जंगलराज होतं, असे मोदी म्हणत आहेत कारण . “मतदार आमच्याबाजूने आहेत त्यामुळे ते घाबरले आहेत. म्हणूनच जंगलराजच नाव घेऊन जनतेला भडकवत आहेत, असे लालू प्रसाद म्हणाले आहेत.
याआधी लालू प्रसाद यादव यांनी X वर पोस्ट करुन भाजपावर निशाणा साधला होता. “मोदी सरकार संविधान संपवणार, आरक्षण समाप्त होणार, लोकशाही संपणार, युवा बेरोजगारीने मरणार, सर्वसामान्य महागाईत होरपळणार” असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी केला होता.