Pramod Sawant : आज लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यामुळे सध्या राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळपासून सर्वसामान्य जनतेसह अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदान केले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी कोठंबी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सावंत यांनी गोव्यात विक्रमी मतदान होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
मतदान केल्यानंतर प्रमोद सावंत म्हणाले की, “मला माहीत आहे की लोक लोकशाहीचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मला आशा आहे की गोव्यात यावेळी विक्रमी मतदान होईल , ते 75% पर्यंत असेल. लोक विकसित भारत आणि विकसित गोव्याला मतदान करत आहेत. तसेच भाजप गोव्यात दोन्ही जागा जिंकेल”, असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.