Loksabha Election 2024 : आज देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. तर या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्यातील एकूण 93 जागांवर मतदान होत असून सध्या राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू.
आता सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. आत्तापर्यंत देशात 50.71 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये पश्चिम बंगालध्ये सर्वाधिक 63.11% टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात अद्यापही कमी मतदान झाले आहे. महाराष्ट्रात 42.63% टक्के मतदान झाले आहे.
3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी
पश्चिम बंगाल – 63.11%
आसाम – 63.08%
छत्तीसगड – 58.19%
मध्य प्रदेश – 54.09%
कर्नाटक – 54.20%
बिहार – 46.69%
दादर-नगर हवेली आणि दमण दीव – 52.43%
गोवा – 61.39%
गुजरात – 47.03%%
उत्तर प्रदेश – 46.78%%
महाराष्ट्र – 42.63%