आज देशभरात होत असलेल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी जवळपास ५० टक्के मतदान सर्वत्र झाले आहे, मात्र मागच्या दोन्ही टप्प्याप्रमाणे याही मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र मतदानाच्या बाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. आज राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण 46.63 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्यातली ३ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
लातूर – 44.48टक्के
सांगली – 41.30 टक्के
बारामती –34.96 टक्के
हातकणंगले – 49.94 टक्के
कोल्हापूर – 51.51 टक्के
माढा –39.11 टक्के
धाराशिव – 40.92 टक्के
रायगड – 41.43 टक्के
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – 44.73टक्के
सातारा – 43.83 टक्के
सोलापूर – 39.54 टक्के