लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात आज दिवसाअखेरीस देशभरात सरासरी ६१. ४५ % मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले असून त्याची टक्केवारी ५४. ०९ % आहे.
देशभरात सर्वाधिक मतदान आसाममध्ये झाले असून त्याची टक्केवारी ७५. २६ टक्के आहे.तर बंगालमध्ये ७३.९३ टक्के इतके मतदान झाले आहे. . उत्तर प्रदेशात ५७. ३४ टक्के, मध्य प्रदेशात ६३ .०९ टक्के मतदान, छत्तीसगडमध्ये ६६.९९ टक्के, बिहारमध्ये ५६.५५टक्के मतदान झाले आहे.आसाममध्ये ७४.८६ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात झाले आहे.महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ५४.०९ टक्के मतदान झाले.
महाराष्ट्रातली आजची मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे –
लातूर- ५५.३८
सांगली- ५२.५६
बारामती- ४५.६८
हातकणंगले- ६२.१८
कोल्हापूर- ६३.७१
माढा- ५०.००
उस्मानाबाद- ५२.७८
रायगड- ५०.३१
रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५३.७५
सातारा- ५४.११ टक्के
सोलापूर- ४९.१७ टक्के
बारामती मतदार संघात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी मतदान झाले असून सरासरी 55 ते 58 टक्के मतदान झाल्याची माहिती.समोर आली आहे. गेल्यावर्षी 61 टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे, खडकवासला मतदार संघात सर्वात कमी मतदान झाल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत देशभरात 284 जागांवर मतदान झाले आहे.आता चौथ्या टप्प्याचे मतदान 13 तारखेला आहे. ज्यात महाराष्ट्रच्या 11 जागांवर मतदान असणार आहे.