पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. पंतप्रधानांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की , “गुरुदेव टागोर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली. त्यांचे चिरंतन ज्ञान आणि प्रतिभा पिढ्यानपिढ्या असंख्य लोकांना आजही प्रेरणा देत आहे आणि प्रबोधन करत आहे.”
https://x.com/narendramodi/status/1788056023682482669
बंगाली आणि इंग्रजीमध्ये लिहिलेल्या या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी गुरुदेवांचा व्हिडिओही शेअर केला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या रचना दोन देशांचे राष्ट्रगीत बनल्या होत्या ही त्यांची विशेष उल्लेखनीय कामगिरी होती. यापैकी ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत आणि ‘अमर सोनार बांगला’ हे बांगलादेशचे राष्ट्रगीत बनले. टागोरांनी कविता, लघुकथा आणि कादंबऱ्यांसह अनेक रचना लिहिल्या ज्या लोकप्रिय आहेत. त्यांना १९१३ मध्ये गीतांजलीसाठी नोबेल पारितोषिक मिळाले होते. जे मिळवणारे ते पहिले गैर-युरोपियन आणि पहिले गीतकार होते.