Deepika Padukone – Ranveer Singh : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. या दोघांचा चाहता वर्गही मोठ्या संख्येत आहे. त्यामुळे त्यांचे चाहते नेहमी त्यांचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ पाहण्यासाठी उत्सुक असतात. तसेच रणवीर आणि दीपिका हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यात आता हे दोघे पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे रणवीर-दीपिका यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच दीपिकाने चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली होती. लवकरच दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. अशातच आता दीपिका-रणवीर यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. रणवीरने त्याच्या लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले आहेत.
रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. त्याच्या प्रोफाईलवर लग्नाचा एकही फोटो दिसून येत नाहीये. त्यामुळे त्याच्या या कृतीनंतर दीपिका आणि त्याच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे. रणवीर आणि दीपिकामध्ये बिनसलं असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत.
दरम्यान, रणवीरने त्याच्या लग्नाचे फोटो डिलीट केले की हाइड केले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तसेच आता सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबाबत रणवीर-दीपिकाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.