काही दिवसांपूर्वीच AstraZeneca या औषध कंपनीने
लसीचे धोकादायक दुष्परिणाम मान्य केले होते. मात्र, कंपनीने ही लस
बाजारातून मागे घेतली आहे. त्यामागची करणे देखील कंपनीने सांगितली आहेत. कोरोना
महामारीच्या काळात जगभरात कोविड लस उपलब्ध करून देणाऱ्या ब्रिटिश फार्मा कंपनी AstraZeneca
ने
जगभरातून कोविड-19 लसीची खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये
भारतात बनवलेल्या कोविशील्ड लसीचाही समावेश आहे.
बाजारातून लस मागे घेण्याचा अर्ज
कंपनीने ५ मार्च रोजी केला होता, जो ७ मे म्हणजे आजच लागू झाला.
AstraZeneca
ने
२०२० मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनाची लस विकसित केली. त्याचा
फॉर्म्युला वापरून सीरम इन्स्टिट्यूटने भारतात Covishield नावाची लस तयार
केली आहे. AstraZeneca ने
सांगितले की, बाजारात आवश्यकतेपेक्षा जास्त लस उपलब्ध आहे, त्यामुळे
कंपनीने सर्व लसी बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात
घेण्यासारखे आहे की काही दिवसांपूर्वी कंपनीने या लसीचे दुष्परिणाम स्पष्ट करताना
सांगितले होते की या लसीच्या वापरामुळे रक्त गोठणे आणि रक्तातील प्लेटलेट्सची
संख्या कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आरोग्य आणि कुटुंब कल्याण
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात आतापर्यंत या लसीचे २२०
कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.