देशातील वातावरण सध्या खूपच बदलताना दिसत आहे. देशातील अनेक भागात
कडक उन्हाळा, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडताना दिसून येत आहे. महाराष्ट्र
राज्यात देखील नागरिकांना उन्हाळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र यातच एक
आनंदाची बातमी समोर येत आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सूनच्या
आगमनाच्या तारखेबद्दल माहिती दिली आहे.
यंदा समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज
पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. २२ मे पर्यंत मान्सूनचे आगमन हे अंदमानात होणार
असल्याचे सांगितले जात आहे. तर महाराष्ट्रात १२ ते १३ जून रोजी मोसमी पावसाचे आगमन
होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. २२ जूननंतर पेरणीसाठी योग्य पाऊस होईल असे डख
यांनी सांगितले. जुलै ,महिन्यात जास्तीचा पाऊस होण्याची शक्यता आहे.