सध्या जगातील अनेक भागात भूकंपाचे धक्के सारखे बसत असल्याचे जाणवत
आहे. भारतात देखील काश्मीर, उत्तराखंड आणि काही भागांत गेल्या काही
महिन्यात तसेच जपान, आणि अन्य देशात देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज अरुणाचल
प्रदेशमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अरुणाचल प्रदेशात आज भूकंपाचे धक्के
जाणवले. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, लोअर सुबानसिरी येथे पहाटे ४:५५ वाजता
भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.1 इतकी मोजली
गेली.
भूकंपामुळे लोक जागे झाले आणि सर्वजण
घराबाहेर पडले. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित
किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. भूकंपामुळे लोक नक्कीच घाबरलेले दिसले.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सध्या भूकंपाचा केंद्रबिंदू आणि त्याची
खोली याबाबत माहिती मिळालेली नाही.