टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या ३० वरिष्ठ केबिन क्रू मेंबर्सनाकामावर न आल्याने बडतर्फ केले आहे. बडतर्फ केलेले हे कर्मचारी ७ मे रोजी रात्री अचानक सामूहिक रजेवर गेले. यामुळे विमान कंपनीला 90 हून अधिक देशातील व आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करावी लागली होती.
इंडिया एक्सप्रेस एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आलोक सिंग यांनी सांगितले की, आज आणि येत्या काही दिवसांत अनेक उड्डाणे रद्द करावी लागतील. कंपनी उड्डाणे देखील कमी करणार आहे. कंपनीने बडतर्फ कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या टर्मिनेशन लेटरमध्ये म्हटले आहे की, तुमचे कृत्य केवळ सार्वजनिक हितालाच बाधक नाही, तर कंपनीसाठीही लाजिरवाणे आहे. तसेच या कृतीमुळे कंपनीच्या गंभीर प्रतिष्ठेचे नुकसान आणि गंभीर आर्थिक नुकसानही झाले आहे.’
तसेच कंपनीने प्रवाशांना केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अभूतपूर्व उड्डाण विलंब आणि रद्द झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. व्यत्यय कमी करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत. कृपया विमानतळावर जाण्यापूर्वी तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा. तुमच्या फ्लाइटवर परिणाम झाला असल्यास, कृपया आमच्याशी WhatsApp किंवा http://airindiaexpress.com/support वर परतावा आणि रीशेड्युलिंग सहाय्यासाठी संपर्क साधा.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या क्रू मेंबर्सच्या आजारपणाचे कारण देत ३०० हुन अधिक कर्मचारी अचानक रजेवर निघून गेल्यामुळेएअरलाइनच्या सुमारे 90 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. खरे तर , सध्या टाटा समूहाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया एक्सप्रेस एआयएक्स कनेक्ट (पूर्वीचे एअरएशिया इंडिया) स्वतःमध्ये विलीन करण्याच्या प्रक्रियेत आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत एअर इंडिया एक्सप्रेसकडून अहवाल मागवला होता.