हॉकी इंडियाने कडून 24 सदस्य असणाऱ्या भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आली आहे. जो संघ बेल्जीयममधल्या अँटवर्प इथे आणि इंग्लंडमधल्या लंडन येथे होणाऱ्या FIH हॉकी प्रो लीग 2023-24 मध्ये सहभागी होणार आहे.
बेल्जियमचा टप्पा 22 मे रोजी सुरू होईल आणि 30 मे रोजी संपेल तर इंग्लंडचा टप्पा 1 जूनला सुरू होईल आणि 12 जून रोजी संपेल. दोन्ही स्पर्धांमध्ये भारत अर्जेंटिना, बेल्जियम, जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनशी प्रत्येकी दोनदा खेळेल. भारतीय संघ 22 मे रोजी अर्जेंटिनाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. भारत सध्या आठ सामन्यांतून 15 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
कर्णधार हरमनप्रीत सिंग संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान, मिडफिल्डर हार्दिक सिंगला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
संघ निवडीबद्दल मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, “आम्ही शिबिरात कठोर परिश्रम घेत आहोत आणि एकमेकांचा खेळ समजून घेण्यास सक्षम आहोत. पॅरिस ऑलिम्पिकच्या आधी, आम्ही उच्च दर्जाच्या संघांविरुद्ध खेळणार आहोत ज्यामुळे आम्हाला आमचा खेळ सुधारता येईल. तसेच हे आम्हाला एक संघ म्हणून आणि वैयक्तिक खेळाडूंच्या रूपात मूल्यमापन करण्यात मदत करेल आणि आम्हाला कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे हे शोधण्यात मदत होईल .”
दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत सिंग म्हणाला, “आम्ही ऑलिम्पिक वर्षात एफआयएच हॉकी प्रो लीगसह हंगाम सुरू करण्यास उत्सुक आहोत, जिथे आम्ही उच्च दर्जाच्या संघांविरुद्ध खेळू. खेळाडूंना अनुभव देण्यासाठी आम्ही एक संघ निवडला होता.तसेच आम्ही बेंगळुरू येथील SAI केंद्रात एक शिबिर घेतले, जिथे आम्ही कठोर प्रशिक्षण सत्रे घेतली आणि आम्हाला वाटले की आम्हाला सुधारणे आवश्यक आहे आता आम्ही सामन्यांची वाट पाहत आहे आणि मला आशा आहे की आम्हाला आमच्या बाजूने निकाल मिळतील.”
भारतीय पुरुष हॉकी संघ पुढीलप्रमाणे आहे.
गोलरक्षक : श्रीजेश परत्तू रवींद्रन, कृष्ण बहादूर पाठक.
बचावपटू : जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), सुमित, संजय, जुगराज सिंग, विष्णुकांत सिंग.
मिडफिल्डर: विवेक सागर प्रसाद, नीलकांत शर्मा, मनप्रीत सिंग, शमशेर सिंग, हार्दिक सिंग (उपकर्णधार), राजकुमार पाल, मोहम्मद राहिल मौसीन.
फॉरवर्ड: मनदीप सिंग, अभिषेक, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय, गुरजंत सिंग, आकाशदीप सिंग, अरजित सिंग हुंडल, बॉबी सिंग धामी.