काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी सॅम पित्रोदा यांच्या ‘वर्णद्वेषी’ टिप्पणीचे खंडन केले आहे आणि एवढी शिक्षित व्यक्ती अशा प्रकारच्या बेजबाबदार वक्तव्य कसे करू शकते याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.
सॅम पित्रोदांनी जे म्हटले आहे त्याच्याशी मी पूर्णपणे असहमत आहे असे वाड्रा यांनी म्हटले आहे
“जेव्हा तुम्ही या (गांधी) कुटुंबाशी निगडीत असता, तेव्हा मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते, तुम्हाला कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी विचार करावा लागेल. सॅम पित्रोदा यांच्या म्हणण्याशी मी असहमत आहे. ‘बकवास की है’. एवढा सुशिक्षित माणूस काही कसे बोलू शकतो? ते राजीव गांधींच्या खूप जवळ होते पण ते थोडे अधिक जबाबदार असले पाहिजे होते , पण त्यांच्या अश्या विधानामुळे भाजपला अनावश्यक मुद्दे उपस्थित करण्याची संधी मिळते.
“तुम्ही इथे येऊन या सरकारच्या चुकांबद्दल बोलता, उणिवा मांडता ते ठीक आहे पण त्यांचे नुकतेच केलेले वक्तव्य हा पूर्ण मूर्खपणा आहे. ते निवृत्त झाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. मी काल त्यांना पत्र लिहिलं होतं की हे चुकीचे आहे,” असे वाड्रा म्हणाले आहेत.
इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या विघटनवादी आणि वर्णद्वेषी वक्तव्याने खळबळ उडाली आहे.ते म्हणाले आहेत की , “यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागातले लोक कसे दिसतात? याची परदेशी लोकांबरोबर तुलना केली होती, “भारत विविधतेने भरलेला देश आहे, जिथे पूर्वेकडचे लोक चिनी लोकांसारखे वाटतात. पश्चिमेकडचे लोक अरबी वाटतात. उत्तरेकडचे लोक थोडे युरोपियन्ससारखे वाटतात. दक्षिणेकडचे लोक आफ्रिकीसारखे दिसतात”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. पण काँग्रेसवाल्यानीही पित्रोदा यांच्या या वक्तव्यापासून अंग झटकले आहे.
जाणून घ्या अधिक बातम्या ..