अकबर की इस बात से हर कोई हैरान था
प्रताप कोई झुकाने के लिए आधा हिंदुस्तान देने को तयार था
पर मेवाडी सरदार को अपनी स्वतंत्रता से प्यार था
इसके लिये उसके लालच भरे
शर्त से इंकार था
मुघल सम्राट अकबराला सळो की पळो करून सोडणारा अत्यंत शूरवीर. अकबराला संपूर्ण भारतभर इस्लामचा ध्वज फडकवायचा होता सतत तीस वर्षे प्रयत्न करून मेवाड अकबराच्या हातात आलं नाही. अकबराच स्वप्न अधूरच राहील, ते केवळ आणि केवळ महाराणा प्रताप यांच्यामुळे. महाराणा प्रताप यांनी एकलिंगजीची शपथ घेतली होती की, कधीच अकबराच्या अधिन राहणार नाही, अकबराच्या विषयी कधीच मनात दयामाया असणार नाही. अत्यंत क्रूर अकबर पूर्ण हिंदूंना नेस्तनाबूत करण्याचे स्वप्न पाहणारा, पण महाराणांच्या मायभुमी मेवाड वर असलेल्या निस्सिम भक्तीने हे हे शक्य झाल नाही.अकबरा शी लढण बलाढ्य मुस्लिम सल्तनतशी झुंज देण सोपं नव्हतं. पण मेवाड वर असलेल प्रेम,दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि शौर्य ह्या गुणांनी महाराणांनी सतत तीस वर्ष मुघल संन्याशी झुंज दिली.
उदयसिंह आणि महाराणी जयवंत कवर हे महाराणांचे आई-वडील . ज्येष्ठ पुत्र म्हणून खरंतर महाराणांकडेच मेवाडच्या गादीचा उत्तरदायित्व होतं .पण उदयसिंहाची लाडकी राणी भाटीयानी हिच्या आग्रहास्तव तिचा मुलगा जागमल याला राज्याभिषेक करावा असा उदयसिंहांनी मृत्यूपूर्वी घोषित केल. पण मेवाडचे सरदार, प्रजा या निर्णयाच्या विरोधात होते. महाराणा शूर आणि पराक्रमी आहेत जागमल कर्तृत्ववान नव्हता असे या सगळ्यांचे मत होतं. मग या सरदारांनी व प्रजेने एक मार्च १७५६ मध्ये महाराणा प्रताप यांना राज्याभिषेक केला. महाराणा प्रताप यांच्या ताकदीची कल्पना आपल्याला त्यांच्या भाल्याचे वजन आणि चिलखताच वजन यावरून येते. त्यांचं चिलखत ७२ किलोंच तर भाला हा ८१ किलोचा होता. तलवार ढाल चिलखत या सगळ्याच वजन २०८ किलो होतं. महाराणा युद्धामध्ये उतरताना हे एक 208 किलोच वजन घेऊन तेवढ्याच शौर्याने तेवढ्याच ताकदीने शत्रू वरती तुटून पडायचे.
अकबराने अनेक वेळा मेवाड वर चाल केली. महाराणाला जिंकण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. अमीरचे महाराज भगवानदास यांचा पुतण्या मानसिंग याला प्रचंड सैन्य दारूगोळा घेऊन मेवाड वरती चढाई करण्याकरता पाठवले. या युद्धाने इतिहासात अमर झाली ती हलदी घाटी. हलदी घाटीत घनघोर युद्ध झालं. सरदार मानसिंग जो रजपूत होता पण अकबराच्या सैन्याच नेतृत्व करत होता.
अकबराची फौज ८०,००० होती. तर महाराणाची २०,०००.पण जिद्द, शौर्य, धडाडी ह्या मुळे रजपूतांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. अकबराच सैन्य महाराणांना पकडु शकले नाही.
महाराणा जख़्मी झाले होते
सगळ्या सरदारांनी महाराणांना युध्दभूमीवरुन जाण्याची विनंती केली. *लाख़ोंचा पोशिंदा जगायला हवा* अशी भावना व्यक्त केली.
ह्या हल्दीघाटी च्या युध्दाच्या ईतिहासात अजरामर झाला तो महाराणा यांचा लाडका घोडा *चेतक* आपल्या धन्यासाठी जख़्मी चेतक ५ किलोमीटर अत्यंत वेगात पळाला. 100 मी. नाल्यावरून उंच उडी मारून राणांना सुख़रूप ठिकाणी पोहचवल. पुढे मात्र काही दिवसात चेतक ला वीरमरण आले. महाराणा दुःख़ी झाले
आजही राजसमंद येथे चेतक ची समाधी आहे.
मानसिंग महाराणाचं अभूतपूर्व शौर्य त्यांची जिद्द त्यांचा पराक्रम पाहून ख़जिल झाला. स्वतः रजपूत असल्याची लाज वाटली मानसिंगला.
महाराष्ट्रात कुतुबशाही आदिलशाही निजामशाही यांच्या विरोधात दंड थोपटून हिंदवी स्वराज्याचे स्थापना करणारे शिवाजी महाराज, व मेवाडचा राजा महाराणा प्रताप या दोघांची व्यक्तिमत्व सारखी आपली मायभूमी,हिंदू धर्म,संस्कृती परंपरा ह्यासाठी आपलं उभ आयुष्य त्यांनी पणाला लावलं. आपलं सर्वस्व त्यांनी अर्पण केलं. केवळ जिद्द, शौर्य, दुर्दम्य इच्छाशक्ती, आपल्या मातृभूमीचं निस्सीम प्रेम यामुळेच, बलाढ्य शत्रूशी झुंजणं त्यांच्यासाठी शक्य झालं. महाराणांना वेळप्रसंगी लपून रानात राहावं लागलं. अक्षरशः गवताची भाकरी खावी लागली सोबत होते त्यांची दोन मुलं आणि पत्नी आता पुढे काय करायचं? मेवाडला कस वाचवायच? ही चिंता मनात असतानाच मदत मिळाली. आणि पुन्हा महाराणां ताकदीने अकबराविरुद्ध उभे राहिले.
जोपर्यंत महाराणा प्रताप होते तोपर्यंत मेवाड हा अकबराला अधिन झाला नाही.
वीरों का उत्साह बढा है
कवी जनमन के गीत सुनाये
नीत स्वतंत्रता दीप जलाये
शौर्य सूर्य की उज्वल कर है
राणा तेरा नाम अमर है
राणा तेरा नाम अमर है
शुभांगी देवधर ,नाशिक
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत