सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक जोरदार
प्रचार सभा घेत आहेत. दरम्यान प्रचार सभेत एकमेकांवर टीका करत असताना राजकारणी
मंडळी आपली पातळी सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे
यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका केली आहे. या टीकेत ठाकरेंनी
त्यांना माकड असे संबोधले आहे. दरम्यान या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडल्याचे फडणवीस
म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि
उपमुख्यमंत्री यांना माकड असे संबोधल्यावर फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ”उद्धव
ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना आता डॉक्टरची गरज आहे. ते रोज काहीतरी
बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी आता उपचार करावेत”, असा जोरदार टोला
फडणवीसांनी ठाकरेंना लगावला आहे. त्यांना सध्या शिव्या देण्याशिवाय दुसरे काहीही
सुचत नाहीये. जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यामुळे ते शिवीगाळ करण्यावर उतरले आहे
असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.