राज्यातील वातावरण सतत बदलताना दिसत आहे. हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदजानुसार १२ ते १५ जून दरम्यान राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असण्याची शक्यता आहे. आज सकाळी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तासाभरात एकूण ४७ मिलीमीटर पाऊस नागपूर शहरात झाला आहे.
आज सकाळी नागपूरमध्ये अचानक वातावरण बदलले. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरु झाला. अनेक भागांमध्ये पाऊस कोसळला आहे. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या देखील पडल्या आहेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील तीन तासांत पुन्हा नागपुरात मुसळधार पाऊस होऊ शकतो. हवामान विभागाने पुढील तीन तासांमध्ये नागपूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच ९ ते १५ मे या काळात राज्यात पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.