लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सभा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित
शाह हे तेलंगणा दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांनी आज तेलंगणा येथील भोंगीर सभेला
संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपा सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि
ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्यात येईल व मुस्लिम आरक्षण संपुष्ठात येईल असे म्हटले
आहे.
प्रचारसभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले,
”काँग्रेस
खोटे बोलून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणतात नरेंद्र मोदी
पंतप्रधान झाल्यास आरक्षण संपवून टाकतील. मागील १० वर्षांपासून मोदी या देशाचे
नेतृत्व करत आहेत.” मात्र त्यांनी आरक्षण संपविले नाही. मात्र काँग्रेस पक्षाने मुस्लिम
समाजाला ४ टक्के आरक्षण देऊन एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या आरक्षणावर गदा
आणली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी
आपल्या भाषणात काँग्रेस, बीआरएस आणि एमआयएम यांना तुष्टीकरणाचा
त्रिकोण म्हटले. ”हे तीन पक्ष सीएए कायद्याचा विरोध करतात. ते तेलंगणाला कुराणच्या
आधारावर चालवू इच्छितात. त्यांना तीन तलाक मागे घ्यायचे आहे. तसेच त्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारंभावर देखील
बहिष्कार टाकला.