पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लगार समितीने एक अहवाल सादर केला आहे. या रिपोर्टनुसार गेल्या ६५ वर्षात हिंदू समाजाची संख्या कमी झाली आहे. देशाततील संख्येने मोठा समजल्या जाणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकसंख्येत घट झाली आहे. दरम्यान १९५० ते २०१५ पर्यंत हिंदूंची संख्या ७.८ टक्क्यांनी घटली आहे. अहवालानुसार भारतात हिंदूंची संख्या कमी झाली आहे. मात्र मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख समाजाबरोबर अल्पसंख्याकांची टक्केवारी वाढली आहे. पण यात जैन आणि पारसी समाजाची लोकसंख्या कमी आहे.
१९५० ते २०१५ दरम्यान मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येत तब्बल ४३. १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ख्रिश्चन समाजाची ६ टक्के तर शीख समाजामध्ये लोकसंख्येत ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १९५० मध्ये हिंदूंची संख्या ८४ टक्के होती. तर २०१५ पर्यंत ती कमी होऊन ७८ टक्के इतकी झाली आहे. याकाळात मुस्लिम समाजाची संख्या ९ टक्क्यांवरून १४ टक्क्यांच्या आसपास गेली आहे.