मे महिना शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी घेऊन आला आहे. या महिन्यात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स २ मे पासून २००० पेक्षा अधिक अंकांनी घसरला आहे. गुरुवारीही BSE सेन्सेक्स १०६२.२२ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक Nifty देखील २ मे पासून ६५० हून अधिक अंकांनी घसरला आहे. गुरुवारी निफ्टी देखील ३४५ अंकांच्या घसरणीसह बंद झाला. त्यामुळे गुंतवणूकदारांना ७.३५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागत आहे.